Back to Home
आषाढी एकादशी
Event
25 Jul, 2026

आषाढी एकादशी

आषाढी वारी म्हणजे भक्ती आणि संस्कृतीचा दिव्य सोहळा! शेकडो वर्षांची वैभवशाली परंपरा असलेली 'आषाढी वारी' महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायाचे प्रतीक आहे. महाराष्ट्रभरातून लाखो वारकरी द...

11:00 AM
IDEAL SCHOOL AND LGM JUNIOR COLLEGE

Event Date

25 Jul, 2026

Event Time

11:00 AM

Location

IDEAL SCHOOL AND LGM JUNIOR COLLEGE

आषाढी वारी म्हणजे भक्ती आणि संस्कृतीचा दिव्य सोहळा! शेकडो वर्षांची वैभवशाली परंपरा असलेली 'आषाढी वारी' महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायाचे प्रतीक आहे. महाराष्ट्रभरातून लाखो वारकरी दरवर्षी भक्तिभावात आणि 'ज्ञानबा-तुकाराम' च्या जयघोषात लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी पायी पंढरपूरला येत असतात. हा केवळ एक प्रवास नसून आत्मशुद्धीचा आणि समर्पणाचा सोहळा आहे. वारीत सहभागी होऊन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतात . यावेळी सर्व वारकरी बांधवांचा प्रवास सुखाचा होवो अशी प्रार्थना विठ्ठलाच्या चरणी केली. यावेळी विठ्ठल नामाच्या जयघोषात टाळ-मृदंगाच्या गजरात वारकरी बांधवांशी संवाद साधण्याची अनुभूती मिळते . भक्तिरसाने ओतप्रोत भरलेल्या या पवित्र क्षणांनी मनात एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते . राम कृष्ण हरी🚩
Category: Event
Posted on 23 Jun, 2026
Loading ......